संस्कृतभारतीच्या वतीने आयोजित ‘संस्कृत सप्ताहा’अंतर्गत SVJCT’s English Medium School येथे दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘संस्कृत सामूहिक सुभाषितपठण’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत सुभाषितांचे शुद्ध, स्पष्ट व लयबद्ध पठण केले. सुभाषितांमधून सदाचार, शिस्त, परिश्रम, विनय व जीवनमूल्यांचे महत्त्व समजावून देण्यात आले. संस्कृतभारतीचे कार्यकर्ते श्री. राजेश ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्त्व व उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शाळेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव, मुख्याध्यापिका प्रज्ञा पारकर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, संस्कारक्षम व प्रेरणादायी ठरला.








